बिगबॉस फेम अभिनेत्री ‘रुपाली भोसले’ अडकली लग्नाच्या बेड्यात? !…सध्या होतीय सोशल मीडियावर व्हायरल..

एखादी कलाकार सुपरहिट झाली की तिचे चाहते, काय करते ? काय खाते ? वगैरे वगैरे अश्या अनेक गोष्टींची माहिती ठेवतात. सध्या प्रसिद्ध असणाऱ्यांबद्दल त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टी व्हायरल होत आहेत. सध्या रुपाली गोष्ट तिच्या एका पोस्ट मुळे चर्चेत आहे. आता ती पोस्ट कोणती ? हे सगळं खालील माहितीत जाणून घेऊयात.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. दुसऱ्या सीझनमधून घराघरात पोहचलेली अभिनेत्री रुपाली भोसले पुन्हा एकदा प्रेमात पडल्याचे तिने सोशल मीडियावर सांगितले होते. तिने अंकित मगरेसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. आपल्या सोशल मीडियावर जरा कलाकार लोकांची एखादी गोष्ट व्हायरल झाली की सारी गावभर पसरते. रुपाली भोसले यांच्याबाबतही तेच झालं. ती लग्न करणार ? अश्या चर्चेला उधाण आलं आहे.

 

रुपाली भोसलें नी इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिच्यासोबत अंकित असून तिच्या गळ्यात मंगळसूत्रही दिसते आहे. त्यामुळे तिने लग्न केले का, आता नुसतं मंगल सूत्र म्हणल्यावर का नाही वाटणार ? लग्न केलं असेल म्हणून. पण ते लग्न हे एखाद्या सेट वरचं पडद्यावरचं ही असू शकतं. हेही मान्य करायला हवं. चला पाहुयात की नेमकं काय आहे, प्रकरण ?

महत्वाचं म्हणजे तिने शेयर केलेल्या फोटो सोबत टाकलेलं कॅप्शन. रुपाली भोसलेने इंस्टाग्रामवर अंकित मगरे सोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, आय लव्ह यू अंकित मगरे. मैं तेरी प्रिन्सेस हूँ. या फोटोत रुपालीच्या गळ्यात मंगळसूत्र दिसते आहे. त्यामुळे त्या दोघांनी लग्न केल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. मात्र अजून या व्हायरल झालेल्या गोष्टीला अजूनही दुजोरा मिळालेला नाही.

आता हे कितपत खरं आणि खोटं हे मात्र रुपाली चं सांगू शकते. कारण तिचे चाहते यातील सत्य माहीत करून घ्यायला फार उत्सुक आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *