हा प्रसिद्ध खेळाडू होणार ‘केकेआर’ टीमचा नवीन ‘कर्णधार’.. नाव ऐकून थक्क व्हाल..

इंग्लंडला विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार, इयान मॉर्गन हा यंदाच्या आयपीएल २०२० मध्ये कोलकत्ता नाईट राईडर्स संघाकडून खेळत आहे. तो एक दर्जेदार असा कर्णधार आणि खेळाडू आहे. अश्यात त्याच्या खेळाचा वापर कोलकत्ता टीम ला जास्त व्हावा या विचाराने त्याच्यावर मोठी जवाबदारी देण्यात आली आहे. कारण सध्या कोलकत्ता ला जर आयपीएल जिंकायचं असेल तर अजून चांगला खेळ करावा लागेल.

दिनेश कार्तिक हा आत्तापर्यंत कोलकत्ता कडून कर्णधाराची भूमिका बजावून खेळत होता. पण आता त्याच्या जागेवर कोलकाता नाईट रायडर्सच्या कर्णधार पदाची धुरा इयान मॉर्गन हा सांभाळेल. टीम सांभाळून फलंदाजी संभाळ करणं कार्तिक ला अवघड जाऊ लागलं. त्यामुळे आता फक्त फलंदाजी वर फोकस करायचा. आणि तसं ही आपल्याकडे दिगग्ज कर्णधार असताना कसली भीती ? या विचाराने त्याने स्वतःहून इयान मॉर्गनकडे जवाबदारी सोपविण्याचं ठरवलेलं आहे.

 

कार्तिक ने संघाला फलंदाजीच्या खेळातून अधिक योगदान देण्याचं ठरवलेलं आहे. त्याने तसा सराव ही सुरू केलेला आहे. दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखाली केकेआरने आतापर्यंतच्या १3 व्या आयपीएल मध्ये सातपैकी चार सामने जिंकले आहेत.आणि गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. मार्च 2018 मध्ये, त्यांच्या दीर्घकालीन कर्णधार म्हणून राहिलेला अष्टपैलू खेळाडू गौतम गंभीरच्या जागी कार्तिकला केकेआरचा नवीन कर्णधार म्हणून नेमण्यात आले होते. कार्तिकच्या नेतृत्वात, केकेआरने 2018 मध्ये प्लेऑफच्या टप्प्यात प्रगती केली होती. मजल मारली होती.

पण गेल्या वर्षी आयपीएल लीगच्या अंतिम टप्प्यात त्यांचा पराभव झाला. 2019 मध्ये झालेल्या IPL च्या आयपीएल हंगामात कार्तिकने आघाडीचं नेतृत्व केले होतं. त्याने 49.8 च्या सरासरीने आणि 147.77 च्या स्ट्राइक रेटने 498 धावा केल्या होत्या.

दरम्यान, या आयपीएलच्या सुरूवातीला केकेआरचा उप-कर्णधार म्हणून नियुक्त झालेल्या मॉर्गनने गेल्या वर्षी इंग्लंडला 50 षटकांच्या विश्वचषकात विजय मिळवून दिला. वर्ल्डकप जिंकण्याचा मान मॉर्गन मुळे मिळाला होता . २०१९ च्या लिलावा मध्ये केकेआरने त्याला 2.25 कोटी रुपये देऊन घेतले होते. योगायोगाने, मॉर्गन यापूर्वी 2011 ते 2013 या तीन हंगामात केकेआरकडून खेळला होता. केकेआरचे मुख्य कार्यकारी अधिकारी वेंकी म्हैसूर म्हणाले, “डीके सारखे खेळाडू आपल्या सोबत असणं हे आपलं भाग्य आहे. त्याच्यासारख्या व्यक्तीने असा मोठा दिलदार निर्णय घेण्यास खूप धैर्य लागते. आम्ही त्याच्या या निर्णयामुळे सुरुवातीला आश्चर्यचकित झालो खरे; पण त्याने त्यावरच्या अभ्यासु वृत्तीने प्रभावित ही झालो. आम्ही त्याच्या इच्छेचा आदर करतो. “आमचेही भाग्य आहे की, २०१९ विश्वकरंडक जिंकणारा कर्णधार इयन मॉर्गन,कर्णधार म्हणून कामगिरी बजावणार आहे. संघाचा पुढाकार घेण्यास तयार आहे. डीके आणि इयान यांनी या स्पर्धेदरम्यान एकत्र काम केले आहे आणि जरी इयानने कर्णधारपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. तरी मिळून काम करणार असं केकेआर टीमचं मत आहे.

केकेआर आपला पुढील सामना 18 ऑक्टोबरला (रविवार) अबूधाबीमध्ये सनराइजर्स हैदराबाद विरूद्ध खेळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *