नागीण मालिका फेम “ही” प्रसिद्ध अभिनेत्री होणार आई ! आम्ही ठरवलं होतं की काहीही झालं तरी 2020….

हिंदी मधील प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अनिता हसनंदानी यांच्या घरात लवकरच पाळणा हलणार आहे.  तिने तिच्या सोशल मीडियावर आपल्या गरोदरपणाच्या बातमीला दुजोरा दिला.

अनिता आणि तिचा नवरा रोहित रेड्डी पहिल्या मुलासाठी/ मुलीसाठी खूप उत्सुक आहेत.  कारण त्यांना आईबाप होऊन त्यांची जवाबदारी घ्यायची आहे.

अनिता लग्नाच्या सात वर्षानंतर आई होणार आहे. रोहित रेड्डीने अनितासोबत त्याचे एक फोटो इंस्टाग्रामवर शेयर केला आहे, ज्यात त्याची बायको अभिनेत्री बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे.

यावेळी तिने आकाशी रंगाचा फुलांचा कुर्ता घातला आहे. रोहितने पांढर्‍या शर्टसह ब्लू डेनिम घातलेला आहे. त्यात ते दोघही फार सुंदर दिसत आहेत. त्यांना दोघांना आई बाप म्हणून बाळाला सांभाळून घेण्याची खूप घाई झालेली आहे.

एका व्हिडिओमध्ये अनिताने म्हटले आहे की, ‘हा देवाचा निर्णय आहे. मला वाटते की ही योग्य वेळ आहे. त्यांच्या लग्नाला सात वर्ष झाली आहेत. अशा परिस्थितीत अभिनेत्री सात वर्षांनंतर आई होण्यासाठी पूर्णपणे तयार आहे .

2020 मध्ये रोहित आणि मला एक मूल हवे होते जेणेकरून आम्ही स्थायिक होऊ शकू. असं तिने म्हंटले आहे. म्हणून त्यांनी मिळून शेवटी बाळजन्म हा निर्णय घेतलाचं.

महत्त्वाचे म्हणजे अनिताने कॉर्पोरेट व्यावसायिक रोहित रेड्डीशी 2013 मध्ये गोव्यात लग्न केले होते. कामाबद्दल बोलायचं म्हणल तर अनिता ‘ नागीन ‘ मालिकेत मध्ये दिसली होती. अनिताने बर्‍याच मोठ्या टीव्ही शोमध्ये काम केले आहे.

टीव्ही क्वीन एकता कपूरशी तिची खास मैत्री आहे. ती बालाजी प्रॉडक्शनच्या अनेक टीव्ही शोमध्ये सहभागी झाली आहे. अजूनही तिची बरेच कामे चालू आहेत. सध्या लॉक डाऊन मुळे ती नवरा आणि कुटुंब सांभाळत आहे.

तिला तिच्या भावी वाटचाली साठी खूप शुभेच्छा !..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *