‘या’ कारणांमुळे शक्तिमान म्हणजेच ‘मुकेश खन्ना’ यांनी केलं नाही लग्न ! कारण वाचून थक्क व्हाल..

लहानपणी आपण सगळे एका मालिकेचं प्रचंड फॅन होतो. ती म्हणजे शक्तिमान. चला तर त्या मालिकेच्या सगळ्या प्रवासाची गोष्ट जाणून घेऊयात.

शक्तिमानकोण हे माहित नसलेला व्यक्ती सापडणं तसं दुर्मिळच आहे. ९०च्या दशकापासून आजपर्यंत प्रेक्षकांच्या मनावर शक्तिमानची जादू कायम आहे. त्यामुळे आजही लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत शक्तिमानचे अनेक चाहते आहेत.

मुकेश खन्ना यांनी आजवरच्या कारकिर्दीमध्ये अनेक मालिका, कार्यक्रमांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे त्याच्या प्रोफेशनल लाइफविषयीची चर्चा कायमच प्रेक्षकांमध्ये रंगत असते.मात्र, या चर्चांमध्ये अजूनही एक चर्चा रंगते ती म्हणजे त्यांच्या लग्नाविषयीची.

मुकेश खन्ना आजही अविवाहित आहेत. त्यामुळे प्रेक्षकांच्या या लाडक्या शक्तिमानने अजूनही लग्न का केलं नाही हा प्रश्न चाहत्यांना सतावत असतो.

अलिकडेच मुकेश खन्ना यांनी ‘On The Talks’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी लग्नाविषयी मौन सोडलं आहे आणि शक्तिमानने म्हणजेच त्यांनी लग्न का केलं नाही हे सांगितलं आहे.

एक काळ होता जेव्हा प्रत्येक मुलाखतीत लग्न कधी करणार असा प्रश्न मला विचारला जायचा. काहींच्या मते, मी महाभारतात भीष्म पितामह ही भूमिका साकारल्यामुळे लग्न करत नाही अशीही चर्चा रंगली होती. मात्र तसं नाहीये”.

मी भीष्म यांचा मनापासून आदर करतो. माझ्या जीवनात मी त्यांना आदर्शदेखील मानलं आहे. मात्र, मी त्यांच्या इतका महान नाही. माझी त्यांच्यासोबत तुलना करणं चुकीचं आहे. तसंच लग्न करणार नाही अशी कोणी शपथ वगैरेदेखील मी घेतलेली नाही. लग्नसंस्थावरही माझा विश्वास आहे”.

लग्न करण्यास माझा कधीच विरोध नाही. पण लग्न करणं ही नशीबाची गोष्ट आहे. अफेअर,प्रेम प्रकरणं लगेच होतात. मात्र, लग्न असं सहज होत नाही. लग्न म्हणजे दोन जीवांचं मीलन असतं आणि लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात”.

त्यांचा लग्न या गोष्टी वर विश्वास नाही म्हणून कदाचित लग्न त्यांनी केलं नाही, असा त्यांचा विचार आहे. मत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *