धकधक गर्ल, माधुरीच्या लग्नाला २१ वर्ष पूर्ण झाले, त्यानिमित्त शेयर केल्या भावना.. म्हणाली, आम्ही दोघेही खूप..

बॉलिवूडची दिग्गज आणि सुंदर अभिनेत्री धकधक गर्ल माधुरी दीक्षितच्या लग्नाला काल 21 वर्ष पूर्ण झालेत. तिने 1999 साली डॉ. श्रीराम नेनेशी लग्न केलं होतं.

लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्त माधुरी दीक्षितच्या चाहत्यांनी आणि चित्रपटातील कलाकारांनी तिचं सोशल मीडियावर खास अभिनंदन केलं आणि शुभेच्छा दिल्या.

माधुरीने नवऱ्यासोबतच्या 21 वर्षांपूर्वी आणि आजचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. ज्यात तिने लिहिलेली भावनात्मक भूमिका सध्या व्हायरल होत आहे.

आज जर आपण नव्वदच्या दशकातील अभिनेत्रींचा विचार केला तर माधुरी सोडता फार कुणी सोशल मीडियावर सतत कार्यरत नाही. त्यामुळे इतरांच्या तुलनेत, माधुरी दीक्षित ही सोशल मीडियावरील सर्वात सक्रिय आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे.

तिने तिचे दोन फोटो तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर आणि फेसबुकवर नवरा डॉक्टर श्रीराम नेनेसोबत शेअर केले आहेत. या दोन्ही फोटोमध्ये माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने एकदम वेगळ्या लूकमध्ये दिसले आहेत. फोटो पाहिल्यावर असं म्हणता येईल की या दोघांचे ते फोटो सध्याच्या क्षणाचे आहेत तर दुसरे थ्रोबॅक.

तिनं त्या पोस्टमध्ये लिहिलं की आज माझ्या स्वप्नातील माणसाबरोबर साहस्याने, आनंदाच्या सहवासाने भरलेल्या आयुष्याच्या वर्षाची 22 सुरुवात आहे.

आम्ही दोघेही खूप वेगळे आहोत; पण तरीही मी आपली खूप आभारी आहे. कारण क्षेत्र वेगळं असलं म्हणून काय झालं ? आपण प्रेमाच्या भावनेतून मला समजून घेतलत. खूप प्रेम आणि अभिनंदन श्रीराम जी..

माधुरीने लिहिलेली ही पोस्ट सांगते की तिचं नवऱ्यावर किती निस्वार्थी प्रेम आहे. सध्या ही पोस्ट खूप व्हायरल होत आहे.

माधुरी आणि श्रीराम नेने या दोन्हीही प्रेमजोडींना लग्न वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा !…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *