‘या’ महिला “IAS” अधिकारीचा धक्कादायक जीवनप्रवास.. वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी आला…

वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी डोळे गेले, आयुष्याला अंधकार आला. आयुष्याच्या भविष्या पुढे सगळं अस्पष्ट दिसत असतानाही ती खचून गेली नाही. थांबली नाही, उभी राहिली ज्ञानातून लहानाची मोठी झाली, शिकत राहिली. कोणी स्वप्नातही विचार केला नसेल की एक आंधळी मुलगी आयएएस बनेल !.तिनं स्वप्न पाहिलं होतं जागेपणी.

प्रांजल पाटील हे त्या ध्येयवादी महिला आयएएस अधिकाऱ्याचं नाव. संघर्ष, चिकाटी, जिद्द, आणि सकारात्मकता यांचा मिलाफ झाला, की यश नक्की मिळते. तिच्या बाबतीतही तेच झालं. यश मिळालं तेही 773 रँक घेऊन पहिल्याचं प्रयत्नात. वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी (रेटिना) या डोळ्यांच्या आजारामुळे तिला, आंधळेपण आलं.

आता सगळं संपलं असं वाटतं असताना तिने मात्र जिद्द सोडली नाही, पुढे तिनं दादर मधील श्रीमती कमला मेहता या शाळेत प्रवेश घेतला.जी शाळा फक्त अंध विद्यार्थ्यांसाठी होती, तिथून प्रांजल ने दहावीचे शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर तिने चंदाबाई कॉलेज मधून बारावी आर्ट्स मधून शिक्षण घेतलं, त्यावेळी तिला हात 85 टक्के मिळाले.

बारावी नंतर पदवीचं शिक्षण सेंट झेवियर कॉलेज मधून पूर्ण केलं. त्यानंतर देशाची राजधानी दिल्ली येथे जेएनयु मध्ये शिक्षण घेण्याची तिची इच्छा होती. तीही पूर्ण झाली. जेएनयु मधून तिने पुढील शिक्षण घेतलं. त्यानंतर एके दिवशी यूपीएससी नावाच्या परीक्षेचा तिनं एक लेख वाचला. आपण ती परीक्षा द्यावी, आणि उत्तीर्ण होऊन देशसेवा करावी.

अशी तिची इच्छा जागृत झाली. असं म्हणतात की प्रयत्न करणाऱ्याला यश मिळतं. पुढं युपीएससी बद्दल तिनं माहिती गोळा करायला सुरुवात केली. आणि 2015 मध्ये यूपीएससी परीक्षेची तयारी खऱ्या अर्थानं सुरू झाली. विशेष म्हणजे यासाठी कोणत्याही कोचिंग क्लासेसचा तिने वापर केला नाही. जपानचे वैचारिक विचारक “डाय साकू” यांचे लेख वाचून तिच्या प्रत्येक दिवसाची सुरुवात होते.

जेव्हा तिनं युपीएससी ची तयारी सुरू केली, तेव्हा ती कुणालाच काही सांगत नव्हती. कारण ती विचार करायची, लोक काय म्हणतील ? एक नेत्रहीन मुलगी चालली यूपीएससी करायला !.. भल्याभल्यांना जमत नाही तिला जमेल ? वगैरे वगैरे..

आपल्या सर्वसामान्य भाषेत बोलायचं झालं तर, तिनं यशाची शांतीत क्रांती केली, आणि खरंच तेच गरजेचं. तिनं ठरवलं होतं शेवटी ते करून दाखवलचं. ती आयएएस अधिकारी झालीच.

नेत्रदीपक माणसे संघर्षाला घाबरतात; पण नेत्रहीन त्याच संघर्षावर मात करतात. प्रांजल पाटील हे यामधील महाराष्ट्रातील एक उदाहरण..अभिमान वाटतो ताई तुमचा. कडक सलाम !…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *