तुम्हाला वारंवार ‘चक्कर’ येत असेल, तर सावधान ! ‘या’ आजारांची लक्षणे असू शकतात…

चक्कर येणे, ही एक सामान्य समस्या आहे. जी जवळजवळ प्रत्येकास कधीतरी कधीतरी आली असेल, परंतु आपण वारंवार चक्कर येत असल्यास काळजी घ्यावी. कारण ही गंभीर आजारांची लक्षणे असू शकतात. काळजी घेणं आपली पहिली जवाबदारी आहे.

खरं तर चक्कर कधी येते ? जेव्हा आपले डोळे, मेंदू, कान, पाय आणि पाठीच्या मज्जातंतूंचा कोणताही भाग काम करणे थांबवतो. वेळीच याची दखल घेतली गेली नाही, डॉक्टर कडे गेला नाहीत तर परिस्थिती गंभीर होऊ शकते.

सतत चक्कर आल्यामुळे आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो ? आणि कोणत्या आजारांच्या लक्षणांवर त्याचा परिणाम होऊ शकतो हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

मेंदूत ऑक्सिजन..

मेंदूत सतत ऑक्सिजनचा पुरवठा आवश्यक असतो. जर तसे झाले नाही, तर ती व्यक्तीला चक्कर येईल किंवा बेशुद्ध पडेल. या चक्कर च्या प्रकरणात आपण शक्य तितक्या लवकर डॉक्टरांकडून तपासणी करुन घ्यावी. नाहीतर एखादा आजार बळावू शकतो.

पाण्याअभावी चक्कर येणे..

बरेच लोक कमी पाणी पितात, त्यामुळे हळूहळू त्यांच्या शरीरात पाण्याची कमतरता भासते. पाणी शरीरात कमी झाल्यास अशक्तपणा येऊ शकतो. यामुळे चक्कर येऊ शकते. ही समस्या विशेषतः वृद्ध आणि मधुमेहाच्या रुग्णांमध्ये अधिक सामान्य आहे. त्यांच्या मध्ये जास्त दिसून येते. पण तरीही पाणी जास्त पिणे खूप गरजेचं आहे.

कानाच्या संसर्गामुळेही चक्कर येऊ शकते..

कानाच्या संसर्गामुळेही चक्कर येऊ शकते. वास्तविक, पाहता ऐकण्याची आणि संतुलन राखण्याच्या आपल्या क्षमतेवर याचा परिणाम होतो. अस्वस्थ परिस्थितीमुळे बहुधा चक्कर येते. याशिवाय जास्त प्रमाणात औषधांचा सेवन केल्याने चक्कर येणे देखील होऊ शकते.

वारंवार चक्कर येणे या आजारांचे लक्षण असू शकते

वारंवार चक्कर येणे हे बर्‍याच रोगांचे लक्षण असू शकते. जसे – तणाव, मायग्रेन, मज्जासंस्थेची समस्या, ब्रेन ट्यूमर किंवा कान ट्यूमर इ म्हणूनच वारंवार चक्कर येण्याच्या समस्येकडे दुर्लक्ष करू नका आणि शक्य तितक्या लवकर डॉक्टरांना दाखवा

तर अश्या प्रकारे चक्कर आपल्याला येऊ शकते. जर ती अधिक प्रमाणात येत असेल, तर डॉक्टरला दाखवून वेळीच उपचार करणं खूप गरजेचं आहे. काळजी घ्या, सुरक्षित रहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *