” हा ” प्रसिद्ध गायक, ज्याने वयाच्या तारुण्यात गाठलं होतं यशाचं उंच शिखर ! आजही करतो रसिकांच्या मनावर राज्य..

ज्या वयात आजकाल तरुणांना नोकरी किंवा आयुष्य उभं करण्यासाठी अनेकांचे उंबरे झिजवायला लागतात. त्यात काहींच आयुष्य स्थिर होतं तर काही अस्थिरतेच्या मार्गाने मार्गक्रमण करत राहतात. पण बॉलिवूड मध्ये एक असा गायक आहे, ज्याने खूप कमी वयात स्वतःचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. जगावेगळं युनिक असं काही करायचं म्हंटलं की मग कसलीही अडचण येत नाही. आली तरी त्यावर मार्ग निघतात. या गायकाला जीवनाची बाजू सांभाळणे खुप कमी वयात कळलं. जे कळण्यासाठी इतरांना अर्ध आयुष्य खर्च करावं लागतं. त्या गायकाचं नाव आहे, अरिजित सिंग. गाण्यांच्या आवाजाचा बादशाह असलेल्या अरिजित सिंग बद्दल जाणून घेऊयात.

२८ व्या वर्षांत पदार्पण करणाऱ्या अरिजितने, एवढय़ा कमी वयात यशाचं एवढं मोठं शिखर गाठलयं, की त्याच्याकडे कौतुकाने पाहावे की ईर्षेने हेच कळत नाही. कारण त्याने अत्यंत अल्प वयात आयुष्याच्या भविष्याचं खजिना उघडून ठेवलाय. जो गाण्यांच्या माध्यमातून तो प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहे.

त्याच्या गाण्यातल्या भावना इतक्या सहजरित्या आणि प्रभावीपणे पोहोचवण्याची कला त्याने कशी अवगत केली असेल ? याचं सगळ्यांना पडलेलं उत्तर फक्त तोच देऊ शकतो.

बरं त्यात अजून भर म्हणजे, त्याने आजच्या काळातल्या प्रत्येक गायकाकडून, मार्गदर्शन स्वरूपात काही ना काही घेतलं आहे, शिकलं आहे. अगदीचं अतीफ अस्लमला यांच्या कडून सुद्धा मार्गदर्शन त्यानं सोडलं नाही !…

पण त्यामुळे झालं असं, की मोहित चौहान, अतीफ अस्लमसारख्या अनेक गायकांची दुकाने बंद होण्याच्या मार्गावर आहेत. कारण अरिजित ने आधुनिक शैलीच्या गाण्यांचा खूप मोठा प्रभाव भारतीय गाण्यांवर पाडलेला आहे. आज सगळ्यांना केवळ आणि केवळ फक्त अरिजितच हवाय ! तो नव्या दमाचा लांबलचक काळाला वेढा घालून कलेला जिवंत ठेवणारा गायक आहे.

अरिजित सिंग ने सगळ्या संगीतप्रेमींचे खरं लक्ष वेधलं ते ” मर्डर 2 ” च्या ‘ दिल संभल जा जरा ’ गाण्याद्वारे. सुरुवात धूम धडाक्यात जी झाली मग ती कुठं थांबलीचं नाही. त्यात पुढं चालून आलेल्या ‘ एजंट विनोद ’मधल्या ‘ राबता ’मुळे तर त्याचा श्रोत्यांबरोबर जो राबता तयार झाला तो आजही तसाच कायम आहे. उलट त्यात रोज भर पडत आहे. भारतात आणि परदेशात सुद्धा त्याचा फार मोठा चाहता वर्ग तयार झाला आहे.

त्याच्या अशा वेगळ्या शैलीच्या प्रेमावर आधारित गाण्यांमुळे रोमँटिक गाणी गाणारा गायक अशी ओळख निर्माण झाली. अरिजितने ‘ फिर ले आया ’ ऐकवून तर प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून टाकलं. बापरे ! काय अभ्यास ? किती रियाझ, करत असेल हा सुप्रसिद्ध गायक !

‘ बर्फी ’ चित्रपटातल्या ‘ फिर ले आया दिल ’मध्ये याने भल्या भल्या गजल गायकांना लाजवेल अशी गायकी सादर करून वेगळीच ओळख निर्माण केली.

मग २०१३ मधला ” आशिकी-2 “…‘ आशिकी-2 ’ हा चित्रपट आणि अल्बम हिट करण्यात, ९० टक्के वाटा हा अरिजितचा आहे. ज्या पद्धतीने त्याने साध्यासुध्या चालीच्या; पण हृदयात गुंगणाऱ्या ‘ तुम ही हो ’ ला कुठच्या कुठे नेऊन ठेवले ! ते दुसऱ्या कुठल्याच सध्या तरी शक्य नाही.

‘ चाहू मै या ना ’ या गाण्याबद्दलपण सुद्धा, हेच म्हणता येईल. की ‘ आशिकी-2 ’ मधल्या अरिजितच्या गायकीवर अतीफ अस्लमचा प्रभाव नक्कीच जाणवतो. विशेष करून आवाजातील कंपनांवरून, त्याने अतीफचा खास अभ्यास केल्याचे जाणवतं..

प्रत्येक गाणं वेगळ्या बाजात गायचं, ही तर त्याची मजबूत बाजू आहे.
प्रेक्षकांना, चाहत्यांना खरा धक्का तर ‘ दिल्लीवाली गर्लफ्रेंड ’ या गाण्याने दिला होता. हे गाणं अरिजितने गायले आहे ! यावर अनेकांचा श्रेयनामावली वाचेपर्यंत विश्वासच नव्हता बसला.

किती वेगळा बाज, ढंग, लय, ताल, सूर वगैर वगैरे. ” वो दिन है और आज का दिन है ” आणि अजून कितीतरी गाणी..

अरिजितचे गायलेलं कुठलच गाणं ऐकायचं सोडू वाटत नाही. त्यात ‘ इलाही मेरा जी आए ’, ‘ कबीरा ’, रामलीलामधले ‘ लाल इश्क़ ’, ‘ आर..राजकुमार’मधले ‘ धोखाढडी..’, ‘ हॅपी न्यू इयर ’मधले ‘ मनवा लागे..’, ‘ यारिया’मधले ‘ लव मी थोडा और ’, ‘ 2 स्टेट्स’मधले ‘ मस्त मगन’, ‘ हॉलिडे’मधले ‘शायराना ’, ‘ किल दिल’मधले ‘सजदे..’, ‘हॅपी एंडिंग मधले ‘ जैसे मेरा तू..’ आणि सर्वात आवडलेलं ‘ हैदर ’ मधील ‘ गुलों मे रंग भरे..’ ही गाणी आज प्रत्येकाला सारखी सारखी ऐकवी वाटतात.

अवघ्या चार-पाच वर्षांत यशाची उंच शिखरे गाठणाऱ्या, हसतमुख गायकीच्या, मेहनती गळ्याच्या अष्टपलू आवाजामुळे त्याचे कोट्यवधी चाहते झाले आहेत.

अश्या हरहुन्नरी गायकाला स्टार मराठी कडून खूप शुभेच्छा !…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *