पाठीच्या मणक्याविषयी तुम्हाला “या” गोष्टी माहिती आहेत का ?

मानवी शरीराच्या प्रत्येक भागाची स्वतःची एक वेगळी भूमिका आणि वैशिष्ट्य असतात. म्हणजे बघा, जर एखाद्या अवयवाला नुकसान झालेलं असेल किंवा त्यामध्ये काही समस्या असल्यास, तर त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो.

काही अवयव असे आहेत, ज्यात समस्या असल्यास उठणे, बसणे आणि हालचाल करणे खूप अवघड होतं.

असाच एक शरीराचा महत्वाचं अंग म्हणजे आपल्या पाठीचा कणा. कणा हा मानवी शरीराच्या रचनेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतो.

पाठीचा कणा आपल्या मेंदूच्या मागील बाजूसुन गुद्द्वारापर्यंत प्रवास करतो. यात एकूण छोटे छोटे 33 विभाग आहेत. जर पाठीच्या हाडांची स्थिती चांगली असेल, म्हणजेच त्यांचे आरोग्य चांगले असेल तर ते मेंदुरुडा साठी खूप चांगली गोष्ट आहे.

याबाबतीत डॉक्टरांचं म्हणणं ही आपण विचारात घ्यायला हवं. गुरुग्राम येथील पारस हॉस्पिटल, स्पाइन अँड न्यूरो सर्जरीचे संचालक डॉ. सुमित सिन्हा म्हणतात की कोरोना कालावधीत घराबाहेर काम करण्याची सवय आमच्या पाठीच्या समस्या वाढवत आहे. ज्यामुळे जेवढं काम तेवढ्या शारीरिक हालचाली खूप गरजेच्या आहेत.

कामाच्या ताणामुळे गेल्या काही महिन्यांपासून पाठीच्या कणा बाबत समस्या वाढल्या आहेत. पूर्वी ही समस्या वयोवृद्ध मर्यादित होती, आता ती तर सामान्य आहे.

मेरुदंडाशी म्हणजेचं पाठीच्या कण्याच्या संबंधित समस्येपासून दूर राहण्यासाठी, आपण सामान्य व्यायाम, पोट आणि पाठीच्या स्नायूंना बळकट करणारे शारीरिक क्रिया करणे आवश्यक आहे. म्हणजे एकंदरीतच व्यायामाची सवय लावणं फार गरजेचं आहे.

आपल्या मणक्याची काळजी घेण्यासाठी योग आणि आसनांचा नित्यक्रमात समावेश केला पाहिजे. रोज व्यायाम केला पाहिजे. मोबाइल फोन, स्क्रीन वेळ आणि दीर्घकाळ बसण्याची सवय कमी करावी.

जर आपण आपल्या शरीराची व्यायामाने काळजी घेतली तर आपलं स्वास्थ्य कायमस्वरूपी सदृढ आणि उत्तम, आरोग्यदायी राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *