अभिनेता आशुतोष भाकरेच्या आत्महत्ये नंतर, त्याचा बायकोने ‘या’ कारणांमुळे केला व्हिडीओ शेयर.. त्यात ती म्हणाली ‘आशुतोष फार…

काही महिन्यांपूर्वी सुशांतसिंग राजपूत अभिनेत्याने आत्महत्या केली. त्या नंतर मराठीत सुद्धा एका अभिनेत्याने आत्महत्या केली. हे वर्ष काही मनोरंजन इंडस्ट्रीत चांगलं चाललेलं दिसत नाहीये. मराठीत ज्या अभिनेत्याने आत्महत्या केली.

त्याची बायको सुद्धा एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिचं नाव आहे, मयुरी देशमुख. तिच्या नवऱ्याचं नाव आहे, आशुतोष भाकरे. तब्बल काही महिन्यानंतर मयुरीने एक भावनिक व्हिडीओ केला आहे. ज्यात तिने तिच्या सगळ्या भावना व्यक्त केल्या आहेत.

काही महिन्यांपूर्वी मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता आशुतोष भाकरे यानं केलेल्या आत्महत्येमुळं सर्वांनाच धक्का बसला होता. डिप्रेशनमुळं आशुतोषनं त्याचं आयुष्य संपवलं. सुशांतसिंग सुद्धा डिप्रेशन मध्ये होता असं म्हणलं जातं. अजूनही बऱ्याच कलाकारांनी या कोरोना काळात आपला जीव गमावला आहे.

अभिनेता आशुतोष भाकरे च्या अचानक जाण्यानं त्याची पत्नी अभिनेत्री मयुरी देशमुख हिला देखील धक्का बसला. तिने त्यानंतर फार काही सोशल मीडिया वापरला नाही.

आशुतोषच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट शेअर केल्यानंतर ती सोशल मीडियापासून लांब होती. आता इतक्या दिवसांनतर तिनं एक व्हिडिओ शेअर केला आहे. तो सध्या खूप व्हायरल होत आहे. तिने तिच्या भावना व्हिडीओ मध्ये व्यक्त केलेल्या आहेत.

आता तिने हा व्हिडीओ खरा मैत्रिणी साठी बनवला होता. मयुरी देशमुख हिनं तिच्या खास मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी हा व्हिडिओ पोस्ट केला खरा. पण या व्हिडिओत ती आशुतोषबद्दलही बोलत आहे. व्यक्त होत आहे.

कारण त्याच्या आत्महत्या केल्यानंतर ती सोशल मीडियावर समोर आली नाही. आशुतोषला डिप्रेशनमधून बाहेर काढण्यासाठी मयुरीच्या या मैत्रिणीनं खूप प्रयत्न, केले होते. तिनं केलेली मदत या सर्व गोष्टींचा उल्लेख तिनं या व्हिडिओत केला आहे. आशुतोष फार व्यक्त होत नव्हता. त्यामुळं त्याच्या भावना मयुरीनं या व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त केल्याचं ती म्हणते.

आशुतोष च्या आईनेही फेसबुकवर भावनिक पोस्ट लिहिली होती. ज्यामध्ये मयुरीने आशुतोष ला डिप्रेशन मधून बाहेर काढण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची भावनात्मक लिखाण आहे. तीही फार व्हायरल झाली आहे.

मयुरी ने व्हिडीओ मध्ये मैत्रिणीने आशुतोष ला डिप्रेशन मधून बाहेर काढण्यासाठी जी काही धडपड केली ती नमूद केली आहे. हा व्हिडीओ करताना मयुरी अजूनही आशुतोष ला थोडं सुद्धा विसरलेली नाहीये. हे तिच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या अवस्थेनं कळतंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *