‘अनिल कुंबळे’ यांचा असा रेकॉर्ड, जो कोणीच मोडू शकणार नाही! हे वाचून तुम्हाला पण गर्व वाटेल..

भारतीय क्रिकेट इतिहासात एक असा लेगस्पिनर होऊन गेला आहे, की ज्याने त्याच्या गोलंदाजीवर भल्या भल्या क्रिकेटर ला आऊट करून मॅचच्या आशा गुंडाळलायला लावल्या होत्या. त्याने दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानात जो विक्रम केला होता, तो आजपर्यंत कुणीच तोडू शकलं नाही. भारतीय संघाला मोलाचं असं अमूल्य योगदान देणाऱ्या गोलंदाजाचं नाव आहे, अनिल कुंबळे.

भारताचा माजी कर्णधार आणि जागतिक क्रिकेट मधील महान खेळाडू अनिल कुंबळेंचा आज वाढदिवस. तो आज 49 वर्षांचा झालेला आहे. 17 ऑक्टोबर 1970 ला त्यांचा जन्म झाला आणि भारताला एक महान खेळाडू मिळाला. पुढं ‘ जंबो ‘ म्हणून जगप्रसिद्ध झाला.

अनिल कुंबळे आणि हरभजनसिंग म्हणजेच जंबो आणि भज्जी, या दोघांच्या गोलंदाजीच्या जुगलबंदीने भारताला अनेक सामने जिंकून दिले आहेत. असे रेकॉर्ड केले आहेत, ते अजूनही कुणी मोडू शकलं नाही.

आज आपण असाच एका रेकॉर्ड बद्दल जाणून घेणार आहोत, की ज्यामध्ये अनिल कुंबळेंनी एकाच इनिंग मध्ये तब्बल 10 विकेट्स घेतल्या होत्या.

4 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी 1999 च्या दरम्यान फिरोजशहा कोटला मैदानात खेळल्या गेलेल्या पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी सामन्यात दुसऱ्या पारित सगळा संघ एकट्यानेच बाद केला होता.

कसोटी सामन्यांत 10 विकेट्स घेणारे जगात फक्त दोनच गोलंदाज आहे, एक अनिल कुंबळे आणि दुसरा इंग्लंडचा खेळाडू जिम लेकर.

क्रिकेटच्या कारकिर्दीत अनिल कुंबळेंनी 132 टेस्ट मॅच मध्ये 29.65 सरासरीने 619 विकेट्स घेतल्या आहेत. त्यात भर म्हणजे 17.77 च्या सरासरीने 2506 रन ही केलेले आहेत. इतकंच नव्हे तर 2007 मध्ये इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात 110 रन करून रेकॉर्ड असं शतक ठोकलं होतं.

नोव्हेंबर 2008 मध्ये दिल्लीत झालेल्या सामन्यानंतर अनिल कुंबळे यांनी क्रिकेट मधून निवृत्ती घेतली.

त्या नंतर त्यांनी आयपीएल क्रिकेट मधील दोन संघाला मार्गदर्शन केलं. भारतीय क्रिकेट टीमचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून जवाबदारी पेलली; पण विराट कोहली सोबत झालेल्या वादानंतर त्यांनी तेही पद सोडलं.

महान खेळाडू ” अनिल कुंबळें ” यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा !…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *