शंख वाजवा आणि हार्ट अटॅक ला दूर पळवा..! वाचून आश्चर्यचकित व्हाल..

भारतीय कुटुंबांमध्ये शंख वाजवणे धार्मिकदृष्ट्या महत्वाचे आहे , शंख वाजवल्याने वातावरणातील सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते असे मानले आहे ; परंतु हे आरोग्यासाठी उत्तम आहे हे फार कमी लोकांना माहित असेल , पाहूया याचे फायदे ..

१) स्नायू मजबूत होतात :

शंख वाजवणे हे मूत्राशय , पोटाच्या खालील भाग , डायफ्राम , छाती आणि मानेच्या स्नायूंसाठी उत्तम ठरतं .याने या सर्व अंगांचा व्यायाम होतो आणि सर्वात महत्वाचे गुदाशयाचे स्नायू मजबूत होतात .

२) प्रोटेस्ट :

शंख वाजवल्याने प्रोटेस्ट क्षेत्रावर दबाव पडतो आणि प्रोटेस्ट स्वास्थ्य सुधारते आणि प्रोटेस्ट वृद्धी रोखण्यात मदत करते .

३) फुफ्फुस निरोगी राहते :

फुफ्फुसांच्या स्नायूंचा विस्तार होतो आणि श्वास घेण्याची क्षमता वाढते .

४)थायरॉईड ग्रंथीत सुधार :

शंख वाजवल्याने थायरॉईड ग्रंथी आणि व्होकल कॉड चा व्यायाम होतो .

५)बोलण्यात स्पष्टता :

याने आपल्या बोलण्यात स्पष्टता येते आणि बोलण्यात संबंधी समस्या दूर होतात .बोबडे बोलणाऱ्या मुलांनी शंख वाजवायला हवा , याने त्यांची वाणी सुधारेल .

६) सुरकुत्या दुर होतात :

शंख वाजवताना चेहऱ्याचे स्नायू खेचले जातात आणि फाईन लाईन्स आपोआप दूर होण्यास मदत मिळते .

७) हार्ट अटॅक पासून बचाव :

नियमित शंख वाजवणाऱ्यांना हार्ट अटॅक चा धोका नसतो आणि शंख वाजवल्याने सर्व ब्लॉकेजेस उघडले जातात .

८) विशेष :

उच्च रक्तदाब , हार्निया , मोतीबिंदू या आजारांनी पीडित लोकांनी शंख वाजवू नये .

९)त्वचा रोग दूर होतात :

रात्रभर शंखात पाणी भरून ठेवावे सकाळी त्या पाण्याने शरीरावर मालिश करावी , त्वचेसंबंधीरोग दुर होतात.

१०)ताण दूर होतो :

याने डोक्यातील सर्व विचार दूर होतात आणि ताण कमी होण्यास मदत मिळते .

११) नकारात्मकता दूर होते :

शंख वाजवताना त्यातून ओम ध्वनी बाहेर पडतो त्याने नकारात्मकता कमी होते आणि सकारात्मकता पसरते .

१२) अतिशय महत्वाचे :

तज्ञांकडून शंख वाजवणे शिकावे , प्रशिक्षण घेतल्या शिवाय शंख वाजविल्यास नुकसान होऊ शकते .

वाजवण्यासाठीचा शंख चाचणी करून निवडावा , तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तो निवडून घ्यावा . वरील माहिती ही सामान्य ज्ञान यासाठी आहे. आम्ही कसलाही दावा करत नाही. काळजी घ्या सुरक्षित रहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *